मेष

चंद्र सहावा उत्तम. मनोबल चांगले. कामात यश मिळेल. हितशत्रुंमुळे लाभ कमी होतील. प्रॉपर्टीची कामे होतील

वृषभ

चंद्र पाचवा मध्यम. मनोबल साधारण राहील. संतांचा सहवास लाभेल. शिक्षणात गोडी जाणवेल. धनप्राप्‍ती होईल.

मिथुन

चंद्र चौथा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. घरात लक्ष द्या. आर्थिक प्राप्ती होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.

कर्क

चंद्र तिसरा उत्तम. मनोबल चांगले. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या. प्रवास कराल. मित्रांशी वाद टाळा.

सिंह

चंद्र दुसरा मध्यम. मनोबल साधारण राहील. घरगृहस्थील व संततीकडे लक्ष द्याल. धंद्यात नुकसान संभवते.

कन्या

चंद्र पहिला उत्तम. मनोबल चांगले. मित्रांची मदत होईल. मित्रांकडून लाभ होईल. आर्थिक प्राप्ती होईल.

तुला

चंद्र बारावा कनिष्ठ. मनोबल कमी. खर्च वाढेल. धंद्यात अडचणी वाढतील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका.

 

वृश्चिक

चंद्र अकरावा उत्तम. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांच्या सहवास लाभेल.

धनु

चंद्र दहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. कला, क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कार्यातून लाभ होईल.

मकर

चंद्र नववा मध्यम. मनोबल साधारण. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कामासाठी प्रवास घडेल. विवाह जुळेल.

कुंभ

चंद्र आठवा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. भावनिक दडपण येईल. अपघात टाळा.

मीन

चंद्र सातवा उत्तम. मनोबल चांगले राहील. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सहजीवन लाभेल.