श्री महावीर जयंती खुलासा

चैत्र शु.१३ या दिवशी श्री महावीर जयंती साजरी केली जाते. रविवार दि.२ एप्रिल २०२३ रोजी द्वादशी (शु.१२) असून या तिथीची समाप्ती सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी पहाटे ६.२४ वाजता आहे.

ज्या ठिकाणी सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६.२४ पूर्वी सूर्योदय होतो त्या ठिकाणी दि.३ एप्रिल रोजी द्वादशीची वृध्दी होते व मंगळवार दि.४ एप्रिल २०२३ रोजी त्रयोदशी येत असून त्याच दिवशी श्री महावीर जयंती आहे. मात्र ज्या ठिकाणी सोमवार दि.३ एप्रिल रोजी सकाळी ६.२४ नंतर सूर्योदय होत असेल त्या ठिकाणी त्रयोदशीची वृध्दी होऊन सोमवार दि.३ व मंगळवार दि.४ एप्रिल या दोन्ही दिवशी त्रयोदशी येते. म्हणून या ठिकाणी सोमवार दि.३ एप्रिल रोजी त्रयोदशी अहोरात्र येत असताना श्री महावीर जयंती आहे.

सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी श्री महावीर जयंती असलेली गावे – महाराष्ट्रातील मुंबई, संपूर्ण कोंकण, पुणे, नाशिक, संगमनेर, शिर्डी, मालेगाव, बारामती, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, संपूर्ण गोवा व गुजरात, कर्नाटकातील बेळगाव, गोकाक, कारवार, मंगळूरू, उडुपी, शिरसी.

मंगळवार दि.४ एप्रिल २०२३ रोजी श्री महावीर जयंती असलेली गावे – महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, छ.संभाजीनगर, जळगाव, जालना, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ, कर्नाटकातील हुबळी, धारवाडसह विजयपूर, कलबुर्गी, होस्पेट, बागलकोट, गदग, हावेरी, म्हैसूर, बेंगलोर, संपूर्ण मध्य प्रदेश.

Share