।। ज्ञानोबांचा पालखी सोहळा ।।

पाऊले चालती पंढरीची वाट ! आषाढी वारी म्हटलं की, विठुरायाच्या भेटीची आस लागते. विठुरायाचे सावळे रूप डोळ्यांत सामावून घेण्यासाठी लाखो वारकरी ऊन-पावसाची पर्वा न करता रात्रंदिवस पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करत असतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे जाणारे वारकरी आपला परंपरागत कुळाचार पार पाडण्यासाठी तयार असतो. हे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी प्रत्येक भक्तगण आतुर झालेला असतो. या वर्षी […]

।। तुकोबांचा पालखी सोहळा ।।

ज्येष्ठ महिना आला की सगळ्यांना वारीचे वेध लागतात. पेरणीच्या कामातून शेतकरी मोकळा झालेला असतो. विठुरायाच्या भेटीची आस लागलेली असते. ही वेळ महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांच्या पालखीची असते. महिनाभर चालणा-या या पालख्यांसह वारकरी विठ्ठलाच्या दर्शनास पंढरपूरला जाण्यास निघतात. लाखो वारकरी राज्याच्या कानाकोप-यातून विठ्ठलनामाच्या जयघोषात या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ […]

।। शिवराज्याभिषेक सोहळा ।।

शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजेच ६ जून, १६७४ रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अभूतपूर्व सोहळा तब्बल नऊ दिवस चालला होता. शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे जणू भारताच्या इतिहासातलं ‘एक सुवर्णपानच’ होतं. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं, त्या काळात आणि त्या आधी परकीय आक्रमणांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला […]

आधुनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल, १९०९ साली तुकडोजींचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. जन्मतःच ते निवाराहीन झाले होते. परंतु याच तुकडोजींनी पुढे सेवाग्रामात अनेक मंदिरे व निवारे उभी करून गोरगरीबांना निवारा उपलब्ध करून दिला. त्यांचे पाळण्यातील नाव माणिक होते. पुढे हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे […]

श्री शंकर महाराज

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी पहाटेच्या निरव शांततेत हे बालक रूपात एका शिवभक्त दाम्पत्याला मिळाले. पुढे या दाम्पत्याने या बालकाचे संगोपन करून त्याचे नाव शंकर असे ठेवले. हेच ते श्री शंकर महाराज होय. शंकर महाराजांनी ‘आपण प्रत्यक्ष कैलासहून आलो असून या पृथ्वीतलावर भक्तीचा मळा फुलवायला आलो आहोत’ असा उच्चार केला. […]

समाजभान जपणारा – रमजान ईद

रमजान महिन्यातील शेवटचा रोजा पूर्ण झाल्यानंतर चंद्रदर्शन होते. त्या वेळी त्याला ‘ईद का चॉंद’ असे संबोधले जाते. चंद्रदर्शन झालेनंतर नव्या महिन्याला सुरुवात होते. जगभरात एकाचवेळी ईद साजरी व्हावी म्हणून चंद्र दिसल्यानंतरच ‘रमजान ईद’ साजरी करण्यात येते. रमजान ईदच्या दिवशी तळागाळातील व्यक्ती देखील या सणापासून वंचित राहू नये म्हणून त्याला मदत करण्यास सांगितले जाते. अशा व्यक्तींना […]

वैशाखातील शिवजयंतीच खरी

खरी शिवजयंती कोणती असा वाद महाराष्ट्रातील इतिहासकार, काही अभिमानी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्यामध्ये सुरू झाला. तो वाद अजूनही पूर्ण संपुष्टात आलेला नाही, अशी अप्रत्यक्ष कबुली शिवचरित्रकार ग. भा. मेहेंदळे यांनी आपल्या मराठी शिवचरित्रात दिली आहे. शिवछत्रपतींसारख्या युगपुरुषाचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना २२ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.२००० साली यश आले. परंतु प्रत्यक्षात १९४९ पासून शिवजन्मतिथी […]

अक्षय्यतृतीयेचे महत्त्व

वैशाख शुद्ध तृतीयेस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व आहे. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा होय. या दिवशी सोने, वाहन, कपडे अशा वस्तूंची लोक खरेदी करत असतात. कारण अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तातील एक शुभ दिवस आहे. शास्त्रामध्ये बुधवारी व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय्यतृतीयेस येईल तो दिवस सर्वात उत्तम समजला […]

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील तसेच दलित बौध्द चळवळीचे प्रेरणास्थान असलेले शिवाय भारतीय बौध्द धर्माचे पुनरुज्जीवक महामानव म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी झाला. […]