आधुनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल, १९०९ साली तुकडोजींचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. जन्मतःच ते निवाराहीन झाले होते. परंतु याच तुकडोजींनी पुढे सेवाग्रामात अनेक मंदिरे व निवारे उभी करून गोरगरीबांना निवारा उपलब्ध करून दिला. त्यांचे पाळण्यातील नाव माणिक होते. पुढे हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे […]

श्री शंकर महाराज

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी पहाटेच्या निरव शांततेत हे बालक रूपात एका शिवभक्त दाम्पत्याला मिळाले. पुढे या दाम्पत्याने या बालकाचे संगोपन करून त्याचे नाव शंकर असे ठेवले. हेच ते श्री शंकर महाराज होय. शंकर महाराजांनी ‘आपण प्रत्यक्ष कैलासहून आलो असून या पृथ्वीतलावर भक्तीचा मळा फुलवायला आलो आहोत’ असा उच्चार केला. […]

समाजभान जपणारा – रमजान ईद

रमजान महिन्यातील शेवटचा रोजा पूर्ण झाल्यानंतर चंद्रदर्शन होते. त्या वेळी त्याला ‘ईद का चॉंद’ असे संबोधले जाते. चंद्रदर्शन झालेनंतर नव्या महिन्याला सुरुवात होते. जगभरात एकाचवेळी ईद साजरी व्हावी म्हणून चंद्र दिसल्यानंतरच ‘रमजान ईद’ साजरी करण्यात येते. रमजान ईदच्या दिवशी तळागाळातील व्यक्ती देखील या सणापासून वंचित राहू नये म्हणून त्याला मदत करण्यास सांगितले जाते. अशा व्यक्तींना […]

अक्षय्यतृतीयेचे महत्त्व

वैशाख शुद्ध तृतीयेस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व आहे. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा होय. या दिवशी सोने, वाहन, कपडे अशा वस्तूंची लोक खरेदी करत असतात. कारण अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तातील एक शुभ दिवस आहे. शास्त्रामध्ये बुधवारी व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय्यतृतीयेस येईल तो दिवस सर्वात उत्तम समजला […]

।। जोतिबाच्या नावानं चांगभलं ।।

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेले जोतिबा मंदिर हे कोल्हापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या जोतिबा देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनी संबोधले जाते. सुमारे १ हजार फूट उंचीवर शंखाकृती आकारात हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या या जोतिबाच्या डोंगराला वाडी-रत्नागिरी असेही म्हटले जाते. या मंदिरातील जोतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेली असून या चतुर्भुज मूर्तीच्या […]

श्री महावीर जयंती खुलासा

चैत्र शु.१३ या दिवशी श्री महावीर जयंती साजरी केली जाते. रविवार दि.२ एप्रिल २०२३ रोजी द्वादशी (शु.१२) असून या तिथीची समाप्ती सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी पहाटे ६.२४ वाजता आहे. ज्या ठिकाणी सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६.२४ पूर्वी सूर्योदय होतो त्या ठिकाणी दि.३ एप्रिल रोजी द्वादशीची वृध्दी होते व मंगळवार दि.४ एप्रिल २०२३ […]

‘श्रीरामनवमी’

(चैत्र शुध्द नवमी) हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुध्द नवमीस श्रीभगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणून ओळखले जाणारे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. म्हणून आजचा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी दुपारी ठिक १२.०० वाजता रामजन्म सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होतो. चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवशी साजरा होणारा हा सर्वात मोठा उत्सव असून या उत्सव […]

महाशिवरात्रीचे महत्त्व

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून सर्वत्र पाळली जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात व भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुस-या दिवशी व्रताची सांगता करतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर […]

श्री गजानन महाराज, शेगांव

श्री गजानन महाराज हे माघ वद्य सप्तमीस सन १८७८ रोजी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम शेगांव येथे प्रकटले. त्यांना पाहताक्षणी ते देवावतार आहेत याची शेगांववासियांना जाणीव झाली. त्यांच्या चेह-यावर सदैव ब्रह्मानंद व ब्रह्मतेज झळकत असे. ते अजानुबाहू असून नेहमी विदेही अवस्थेत असत. त्यांच्या प्रकटनानंतर त्यांची महती गावोगावी पसरत गेली. समाजातील गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित सर्व लोक त्यांचे […]

श्रीकृष्ण सरस्वती महाराज

श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचा जन्म माघ महिन्यातील वद्य पंचमीला कोल्हापूर येथील नांदणी गावी झाला. दत्त संप्रदायातील ते एक थोर सत्पुरुष म्हणून नावारूपास आले. तसेच सांप्रदायिक श्रध्देनुसार स्वामींना दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते. कोल्हापुरातील कुंभार आळीमध्ये त्यांचे वास्तव्य राहिले असल्याकारणाने ते मुख्यतः ‘कुंभारस्वामी’ या नावाने ओळखले जात. श्रीकृष्ण सरस्वती हे १४-१५ वर्षांचे असताना यांना त्यांचे कुलदैवत श्री […]