आजपासून सुरू होणा-या नाईकबा यात्रेचे महात्म्य !

कऱ्हाड जवळच्या ढेबेवाडी चा नाईकबा हे अनेक घराण्यांचा कुलस्वामी. आज चैत्र शुद्ध षष्ठीला नाईकबाची यात्रा असते. स्वयंभू स्वरूपात असणारा नाईकबा हे भैरवाचेच रुप आहे. नाईक अर्थात सैन्य दलाचा प्रमुख. अनेक भक्तांच्या समजूती नुसार दक्षिणेतील दैत्यांचा संहार करण्यासाठी देव ज्योतिबा उत्तरेहून आला. त्याच्या भैरव सैन्यातील एक प्रधान भैरव म्हणजे नाईकबा. नायक अर्थात प्रमुख. त्याला लागलेला मराठमोळा पितृस्वरूप बा हा प्रत्यय म्हणून हा नाईकबा. नाथ केदाराप्रमाणेच यांची पितळी घोड्यावर स्वार चतुर्भुज मूर्ती देवघरात पूजली जाते. गुलाल खोबऱ्याची उधळण होते. कऱ्हाड हुन येणाऱ्या मानाच्या काठ्यांसह अनेक सासनकाठ्या सोहळ्याला हजेरी लावत असतात. 

श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

Share