नरवीर तानाजी मालुसरे
तानाजी मालुसरे यांचा जन्म इ.स.१६२६ साली सातारा जिल्ह्यातील गोडवली येथे झाला. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर उंबरठ येथील शेलारमामांच्या घरीच त्यांचे संगोपन झाले.
तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. तानाजी मालुसरे यांचा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग होता.
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्यांच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
कोंढाण्याची लढाई – सिंहगडची लढाई फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगड किल्ल्यावर रात्रीच्या सुमारास झाली. ही लढाई मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे आणि सिंहगडचा राजपूत किल्लेदार उदयभानसिंग राठोड यांच्यात झाली. वेढा घेण्याच्या वेळी तानाजी यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने किल्ल्याकडे जाणा-या एका उंच खडकावर पोचला. गडावर चढताना मराठ्यांना पहारेक-यांनी रोखले होते आणि यावेळी पहारेकरी व काही घुसखोर यांच्यात लढाई झाली. उदयभानने तानाजीची ढाल फोडली आणि त्याची भरपाई केली. त्याने त्याच्या शेजारीच असलेल्या आपल्या पगडीचे कापड लपेटले आणि लढाई सुरूच ठेवली. त्यानंतर उदयभानने त्याचे कवच तोडले, पण तानाजीने त्याचा सामना केला. ते दोघेही युध्दामध्ये मारले गेले. अखेरीस दुस-या मार्गावरून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला.
अशा या नरवीर तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुण्याजवळील सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळाही त्या ठिकाणी आहे. रायगडमधील उमरठ ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कवलापूर या गावी देखील नरवीर तानाजी मालुसरे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. अशा या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या आजच्या स्मृतिदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम!