समाजभान जपणारा – रमजान ईद

रमजान महिन्यातील शेवटचा रोजा पूर्ण झाल्यानंतर चंद्रदर्शन होते. त्या वेळी त्याला ‘ईद का चॉंद’ असे संबोधले जाते. चंद्रदर्शन झालेनंतर नव्या महिन्याला सुरुवात होते. जगभरात एकाचवेळी ईद साजरी व्हावी म्हणून चंद्र दिसल्यानंतरच ‘रमजान ईद’ साजरी करण्यात येते.

रमजान ईदच्या दिवशी तळागाळातील व्यक्ती देखील या सणापासून वंचित राहू नये म्हणून त्याला मदत करण्यास सांगितले जाते. अशा व्यक्तींना ईदपूर्वी जकात दिली जाते, जेणेकरून ही वंचित मंडळीसुध्दा वर्षातील एक दिवस आनंदाने सण साजरा करू शकतील. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपूर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. सामाजिक न्याय, समता उदारता, समरसता याचे महत्त्व देखील विषद केले आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले सारे आयुष्य वाहून घेतले. सगळ्या जातिधर्मातील सण-उत्सवांनी आपल्याला विश्वबंधुत्वाचीच शिकवण दिली असून, ती आपण सर्वांनी मिळून अंगीकारायला हवी आणि आपण सर्व एक आहोत, आपली संस्कृती, मातृभूमी ही देखील एकच आहे. त्यामुळे एकमेकांच्या कल्याणाकरिता जे जे काही करता येईल ते ते आपण करायला हवे. हाच तर या सणाचा संदेश आहे.

ऐ खुदा

बस यही गुजारिश है तुमसे…

धन बरसे या ना बरसे पर…

रोटी या प्यार को ना तरसे…!

Share