।। शिवराज्याभिषेक सोहळा ।।
शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजेच ६ जून, १६७४ रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अभूतपूर्व सोहळा तब्बल नऊ दिवस चालला होता. शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे जणू भारताच्या इतिहासातलं ‘एक सुवर्णपानच’ होतं. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं, त्या काळात आणि त्या आधी परकीय आक्रमणांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला […]