‘मराठी राजभाषा दिन’

मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, नाटककार तसेच मराठी मनाचा मानबिंदु असलेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रजांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला असून त्यांनी आपल्या विलक्षण लेखणीतून प्रतिभा कौशल्याच्या आणि शब्दसामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून विपुल साहित्य निर्मिती करून मराठी भाषेला […]

इतिहासातील एक सोनेरी पान – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’

भारताच्या आधुनिक इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते महान कवी, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय. आपल्या मातृभूमीवर निर्व्याज प्रेम असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आजच्या काळात देखील भारतीयांना मार्गदर्शक ठरतात. जाज्वल्य देशभक्ती, प्रगल्भ प्रतिभाशक्ती, प्रेरक नेतृत्त्व, तत्त्वनिष्ठ हिंदुत्त्ववादी राजकारणी, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेतृत्त्व असणारे, धर्माभिमान व […]

जागतिक मुद्रण दिन

२४ फेब्रुवारी रोजी मुद्रण कलेतील जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ साजरा करण्यात येणारा हा दिवस ‘जागतिक मुद्रण दिन’ म्हणून ओळखला जातो. सर्वप्रथम मुद्रण पद्धतीचा शोध हा चीनमध्ये लावला गेला. त्या काळात उपकरणाचे साधन म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा वापरली जात असे. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवला जात असे. […]

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे परीट घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झिंग्राजी व आईचे नाव सखुबाई असे होते. संत गाडगेबाबांना डेबूजी या नावाने ओळखले जात होते. त्यांना लहानपणापासून भजन, कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे असून ते अंगावर नेहमी फाटकी […]

।। श्री रामकृष्ण परमहंस ।।

रामकृष्ण परमहंस यांचा जन्म बंगालमधील कामाटपूकर या गावी एका गरीब वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे बालपणही तेथेच गेले. त्यांच्या लहानपणीच वडील क्षुदिराम यांना गयेतील तीर्थयात्रेवेळी गदाधर विष्णूचे स्वप्नात दर्शन झाले होते म्हणून या बालकाचे नाव गदाधर असे ठेवण्यात आले. लहानपणी त्यांना गदा या नावाने ओळखले जात होते. वडिलांच्या निधनानंतर परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्यांचे थोरले बंधू […]

डी.एन.शिर्के तथा आबाजी

जीवनकार्य व परिचय मे. शिर्के कॅलेंडर, श्री महालक्ष्मी दिनदर्शिका आणि मे.डी.एन.शिर्के ॲण्ड सन्स, रबरी शिक्क्यांचे उत्पादक या उद्योगांचे संस्थापक व प्रवर्तक श्री. दत्तात्रय नामदेव शिर्के म्हणजेच डी.एन.शिर्के तथा आम्हा सर्वांचे आबाजी होत. इ.स.१९१० मध्ये दत्तजयंतीच्या शुभदिनी जन्मलेले हे आबाजी चिकाटीचे, कष्टाचे, जिद्दीचे यशस्वी जीवन जगत त्यांनी सर्व व्याप आपल्या मुलांच्या हाती सोपवून तो ते कार्यक्षमतेने […]

॥ तयाचा वेलू गेला गगनावरी…॥

कोल्हापुरातील नामांकित चित्रकार व छायाचित्रकार श्री. दत्तात्रय नामदेव ऊर्फ डी. एन. शिर्के व सौ. सरस्वतीबाई यांच्या संसारवेलीवर १२ जानेवारी १९४८ रोजी आणखी एक फूल उमलले-त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव ठेवले सदाशिव. श्री. डी. एन. शिर्के यांनी १९४४ साली कोल्हापुरात महाद्वार रोडवर भाड्याच्या जागेत रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच त्यांनी स्वतःच्याच नावे पहिली […]

आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजीराजे नाईक

उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला. उमाजी नाईक यांचे वडील दादोजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे लहानपणापासूनच […]