महाशिवरात्रीचे महत्त्व

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून सर्वत्र पाळली जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात व भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुस-या दिवशी व्रताची सांगता करतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर […]

श्री गजानन महाराज, शेगांव

श्री गजानन महाराज हे माघ वद्य सप्तमीस सन १८७८ रोजी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम शेगांव येथे प्रकटले. त्यांना पाहताक्षणी ते देवावतार आहेत याची शेगांववासियांना जाणीव झाली. त्यांच्या चेह-यावर सदैव ब्रह्मानंद व ब्रह्मतेज झळकत असे. ते अजानुबाहू असून नेहमी विदेही अवस्थेत असत. त्यांच्या प्रकटनानंतर त्यांची महती गावोगावी पसरत गेली. समाजातील गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित सर्व लोक त्यांचे […]

श्रीकृष्ण सरस्वती महाराज

श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचा जन्म माघ महिन्यातील वद्य पंचमीला कोल्हापूर येथील नांदणी गावी झाला. दत्त संप्रदायातील ते एक थोर सत्पुरुष म्हणून नावारूपास आले. तसेच सांप्रदायिक श्रध्देनुसार स्वामींना दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते. कोल्हापुरातील कुंभार आळीमध्ये त्यांचे वास्तव्य राहिले असल्याकारणाने ते मुख्यतः ‘कुंभारस्वामी’ या नावाने ओळखले जात. श्रीकृष्ण सरस्वती हे १४-१५ वर्षांचे असताना यांना त्यांचे कुलदैवत श्री […]

संत नरहरी सोनार महाराज

संत नरहरी सोनार यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ ला इ.स.११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला. ते वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते. नरहरीच्या पत्नीचे नाव […]

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होत. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. संत निवृ​त्तीनाथांचे जन्मवर्ष १२७३ असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तीनाथ ह्या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते. निवृ​त्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना सहज उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) […]

संत रोहिदास

संत रोहिदास

महान हिंदू संत रोहिदास यांचा जन्म चर्मकार घराण्यात आई घुरबिनिया यांचे पोटी वाराणसी जवळील सीर गोवरधनपूर गावात झाला. त्यांचे जन्मस्थान श्री गुरू रविदास या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव रघुराम असून ते चामड्याचे काम करीत होते. परंतु त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले. […]

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

‘तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम येईलच’ ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला, त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे […]

माणसे घडविणारे चालते-बोलते विद्यापीठः संत भगवानबाबा

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव येथे २९ जुलै १८९६ रोजी भगवानबाबांचा जन्म झाला. विसाव्या शतकातील होऊन गेलेले एक महान संत म्हणून संत भगवानबाबा यांना ओळखले जाते. अशा या भगवानबाबांची राहणी अत्यंत साधी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी आयुष्यभर अंधश्रध्दा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याचे महत कार्य केले. […]

आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज

श्री साईबाबा, श्री गजानन महाराज यांसारख्या थोर संतांचे चरित्र आपल्या लिखाणातून जनमानसांपर्यंत पोहचविणारे संत म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज. ते कवी तसेच कीर्तनकार देखील होते. ६ जानेवारी १८६८ रोजी उमरी (जि.नांदेड) येथे त्यांचा जन्म झाला. (काही ठिकाणी त्यांचा जन्म १८६७ साली अकोळनेर, अहमदनगर येथे झाल्याचा उल्लेख आढळतो.) लहानपणापासूनच ते धार्मिक वृत्तीचे होते. तरुणपणी […]

दि.२ मे (वैशाख शु.२) रोजी होणाऱ्या शिवजयंतीविषयक…!

खरी ‘शिवजयंती’ कोणती? असा वाद महाराष्ट्रातील इतिहासकार, काही अभिमानी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्यामध्ये सुरू झाला. तो वाद अजूनही पूर्ण संपुष्टात आलेला नाही, अशी अप्रत्यक्ष कबुली सध्याचे अधिक प्रसिद्ध असे शिवचरित्रकार ग.भा.मेहेंदळे यांनी आपल्या मराठी शिवचरित्रात दिली आहे. शिवछत्रपतींसारख्या युगपुरुषाचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना २२ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.२००० साली यश आले. परंतु प्रत्यक्षात १९४९ […]