श्री रेणुकादेवी प्रकट दिन !

आज चैत्र कृष्ण पंचमी. आदिशक्ती अयोनीजा बालिका रूप घेऊन ईक्ष्वाकू वंशी रेणू (प्रसेनजीत) राजाच्या यज्ञकुंडातून प्रकटली तो आजचा दिवस. काही परंपरांमध्ये चैत्र शुद्ध तृतीया हा दिवस रेणुकेचा प्रकट दिन मानला जातो; पण सौंदत्ती परंपरेत चैत्र तृतीया ही तिथी रेणुकेच्या मलप्रभा तीरावर स्नानाला जाणे आणि नंतर झालेल्या शिरच्छेदाची मानली जाते. परशुराम कवीकृत रेणुका माहात्म्य ग्रंथात (रामत्त्व […]

करवीरचा लोकोत्सव… श्री करवीरनिवासिनीचा रथोत्सव !

जोतिबा यात्रेचा दुसरा दिवस. परंपरेप्रमाणे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी आई अंबाबाईचा रथोत्सव. दरवर्षी या दिवशी दुपारनंतर स्वयंस्फूर्तीने महाद्वार रस्ता, गुजरी, भाऊसिंगजी रस्ता, भवानी मंडप, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटीचा शेषशायी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (नूतन मराठी शाळा ते बिनखांबी गणेश मंदिर) ते महाद्वार रस्ता हा सगळा मार्ग आपोआपच बंद केला जातो. आधीच पॉलिश केलेला आणि […]

आनंद सोहळा लग्नाचा… श्री रेणुका-जमदग्नींचा !

रेणुका माहात्म्य ग्रंथातल्या कथेत सर्व अध्ययन झाल्यावर भगवान शंकर परशुरामांना म्हणाले, ‘भार्गवा, तुला अजून काही जाणून घ्यायचे आहे का?’ तेव्हा परशुराम म्हणाले, ‘हे परमेश्वरा, मला असं काहीतरी सांगा जे सर्वांना अज्ञात आहे.’ तेव्हा शंकरांनी परशुरामांना विचारले, ‘तू तुझ्या आई-वडिलांना ओळखतोस का?’ तेव्हा हसून परशुराम म्हणाले, ‘हा काय प्रश्न आहे?’ काश्मीर देशाच्या ईक्ष्वाकू कुळातील प्रसेनजित अर्थात रेणू […]

ज्योतिर्लिंग यात्रा, जोतिबा डोंगर कोल्हापूर

देव जोतिबा कोट्यवधी भक्तांच्या भक्तीविश्वाचा अधिपती. या देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदोल्हासाचा क्षण ! पाडव्याला उभी केलेली सासनकाठी कामदा एकादशीला डोंगरावर आणायची. देवाला प्रदक्षिणा घालून नेमलेल्या जागी उभी करायची. हस्त नक्षत्रावर नाथ केदार यमाई भेटीला निघतो, तेव्हा ही सासनकाठी मिरवत यमाईकडे जायचं. नाथाचा गुलाल होऊन तृप्त व्हायचं. हा यात्रेचा विधी पण यामागचा इतिहास […]

सासनकाठी -: नाथ केदाराचा विजय ध्वज

 20 फूटाहून अधिक उंचीची वेळूची बांबूची काठी त्याला पटके, निशाण, फरारा त्यावर आपल्या कुलपरंपरेला दर्शवणारं चिन्ह व नाव, वरच्या टोकाला कलश, चवरी, गोंडा, मोर्चेल, चोपाची मूठ यापैकी आपल्यात जी रीत असेल ती. जमिनीपासून 5 – 5.5 फूटावर आडवी फळी त्यावर देवाची मूर्ती किंवा घोडा. अशी सासनकाठी पाडव्याला मढवून उभी केली त्या काठी सह मानकरी मंडळींना […]

भवानी देवीच्या उत्पत्ती विषयी माहिती !

भवानी देवीच्या उत्पत्ती विषयी माहिती !

आज चैत्र शुद्ध अष्टमीअखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या भवानी जगदंबे चा प्रगट दिन!कोणे एकेकाळी कृत युगात दंडकारण्यात यमुनाचल पर्वतावर कर्दम नावाचे ऋषी आपली पत्नी अनुभूती सह रहात होते. अनुभुती गर्भवती असतानाच कर्दम ऋषींचा देहांत झाला. पोटात मूल असल्याने सती न जाता अनुभुती तपस्विनी म्हणून जीवन जगत होती. मुलाला जन्म देऊन ती पुन्हा तपात निमग्न झाली. तीचं […]

चैत्र महिन्यात देवांना दवणा का वाहतात याची कथा.

चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते.  दवणा म्हणजे दमनक  शिवाच्या क्रोधातून कालभैरव प्रगटला, प्रगट होताच त्यानं ब्रम्हदेवांच पाचवं मस्तक तोडले ते त्याच्याच डाव्या हाताला ब्रम्हहत्या होऊन चिकटलं त्यातून गळणारं रक्त प्यायला कुत्री पिशाचं गोळा झाली तर  त्यांचा आणि या उग्र बटूच्या भय निर्माण करणाऱ्या रव म्हणजे […]