शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ।।

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. सुमारे ३०० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी असा एकही दिवस जात नाही की, शिवाजी महाराजांचे नाव घेतले जात नाही. अखिल भारतवर्षात शिवाजी महाराजांच्यासारखे दुसरे व्यक्तिमत्त्व सापडत नाही. महाराजांना स्वातंत्र्याचे व स्वाभिमानाचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांच्या मातोश्रींनी पाजलेले होते. त्यामुळे परस्थांच्या मगरमिठीत सापडलेला प्रदेश सोडवून त्यांनी जनतेला स्वातंत्र्यानुभव घडवून दिला. […]

महाशिवरात्रीचे महत्त्व

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून सर्वत्र पाळली जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात व भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुस-या दिवशी व्रताची सांगता करतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर […]

डी.एन.शिर्के तथा आबाजी

जीवनकार्य व परिचय मे. शिर्के कॅलेंडर, श्री महालक्ष्मी दिनदर्शिका आणि मे.डी.एन.शिर्के ॲण्ड सन्स, रबरी शिक्क्यांचे उत्पादक या उद्योगांचे संस्थापक व प्रवर्तक श्री. दत्तात्रय नामदेव शिर्के म्हणजेच डी.एन.शिर्के तथा आम्हा सर्वांचे आबाजी होत. इ.स.१९१० मध्ये दत्तजयंतीच्या शुभदिनी जन्मलेले हे आबाजी चिकाटीचे, कष्टाचे, जिद्दीचे यशस्वी जीवन जगत त्यांनी सर्व व्याप आपल्या मुलांच्या हाती सोपवून तो ते कार्यक्षमतेने […]

श्री गजानन महाराज, शेगांव

श्री गजानन महाराज हे माघ वद्य सप्तमीस सन १८७८ रोजी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम शेगांव येथे प्रकटले. त्यांना पाहताक्षणी ते देवावतार आहेत याची शेगांववासियांना जाणीव झाली. त्यांच्या चेह-यावर सदैव ब्रह्मानंद व ब्रह्मतेज झळकत असे. ते अजानुबाहू असून नेहमी विदेही अवस्थेत असत. त्यांच्या प्रकटनानंतर त्यांची महती गावोगावी पसरत गेली. समाजातील गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित सर्व लोक त्यांचे […]

श्रीकृष्ण सरस्वती महाराज

श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचा जन्म माघ महिन्यातील वद्य पंचमीला कोल्हापूर येथील नांदणी गावी झाला. दत्त संप्रदायातील ते एक थोर सत्पुरुष म्हणून नावारूपास आले. तसेच सांप्रदायिक श्रध्देनुसार स्वामींना दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते. कोल्हापुरातील कुंभार आळीमध्ये त्यांचे वास्तव्य राहिले असल्याकारणाने ते मुख्यतः ‘कुंभारस्वामी’ या नावाने ओळखले जात. श्रीकृष्ण सरस्वती हे १४-१५ वर्षांचे असताना यांना त्यांचे कुलदैवत श्री […]

संत नरहरी सोनार महाराज

संत नरहरी सोनार यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ ला इ.स.११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला. ते वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते. नरहरीच्या पत्नीचे नाव […]

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होत. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. संत निवृ​त्तीनाथांचे जन्मवर्ष १२७३ असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तीनाथ ह्या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते. निवृ​त्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना सहज उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) […]

संत रोहिदास

संत रोहिदास

महान हिंदू संत रोहिदास यांचा जन्म चर्मकार घराण्यात आई घुरबिनिया यांचे पोटी वाराणसी जवळील सीर गोवरधनपूर गावात झाला. त्यांचे जन्मस्थान श्री गुरू रविदास या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव रघुराम असून ते चामड्याचे काम करीत होते. परंतु त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले. […]

नरवीर तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे यांचा जन्म इ.स.१६२६ साली सातारा जिल्ह्यातील गोडवली येथे झाला. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर उंबरठ येथील शेलारमामांच्या घरीच त्यांचे संगोपन झाले. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. तानाजी मालुसरे यांचा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग होता. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार […]

॥ तयाचा वेलू गेला गगनावरी…॥

कोल्हापुरातील नामांकित चित्रकार व छायाचित्रकार श्री. दत्तात्रय नामदेव ऊर्फ डी. एन. शिर्के व सौ. सरस्वतीबाई यांच्या संसारवेलीवर १२ जानेवारी १९४८ रोजी आणखी एक फूल उमलले-त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव ठेवले सदाशिव. श्री. डी. एन. शिर्के यांनी १९४४ साली कोल्हापुरात महाद्वार रोडवर भाड्याच्या जागेत रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच त्यांनी स्वतःच्याच नावे पहिली […]