श्री रेणुकादेवी प्रकट दिन !
आज चैत्र कृष्ण पंचमी. आदिशक्ती अयोनीजा बालिका रूप घेऊन ईक्ष्वाकू वंशी रेणू (प्रसेनजीत) राजाच्या यज्ञकुंडातून प्रकटली तो आजचा दिवस. काही परंपरांमध्ये चैत्र शुद्ध तृतीया हा दिवस रेणुकेचा प्रकट दिन मानला जातो; पण सौंदत्ती परंपरेत चैत्र तृतीया ही तिथी रेणुकेच्या मलप्रभा तीरावर स्नानाला जाणे आणि नंतर झालेल्या शिरच्छेदाची मानली जाते. परशुराम कवीकृत रेणुका माहात्म्य ग्रंथात (रामत्त्व […]